वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 'झिरो'वर बाद होण्याचा नकोसा मान या खेळाडूंकडे
2 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्प्रधेत सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम सहा प्लेयर्सच्या नावावर आहे.
इंग्लंडची कॅथरीन ब्रंट ही आघाडीवर असून ती 13 डावात 4 वेळा शून्यावर बाद झाली आहे.
बांगलादेशची फारगना हक 15 डावात 4 वेळा शून्यावर बाद झाली आहे.
पाकिस्तानची सना मीर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर अूसन 21 डावात 4 वेळा शून्यावर बाद झाली आहे.
इंग्लंडची डॅनियल वॅटही चारवेळा शून्यावर बाद झाली आहे. पण 23 डाव खेळल्याने चौथ्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडिजचनी डियांड्रा डॉटिन 4 वेळा शून्यावर बाद झाली असून पाचव्या स्थानी आहे. तिने 29 डावात नकोशी कामगिरी केली आहे.
न्यूझीलंडची सोफी डिवाइन 31 डावात 4 वेळा शून्यावर बाद झाली आहे. तसेच सहाव्या स्थानावर आहे.