हे खेळाडू दोन देशांसाठी खेळले, एकाने जिंकला वर्ल्डकप
15 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
स्टार अष्टपैलू कोरी अँडरसन दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.
कोरी अँडरसनने 2018 पर्यंत न्यूझीलंडकडून खेळला. तसेच 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिकेकडून खेळला.
ऑस्ट्रेलियात जन्मलेला डर्क नॅन्स ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड या दोन संघाकडून खेळला.
डर्क नॅन्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द नेदरलँडमधून सुरु झाली. दोन महिन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात सहभागी झाला.
इंग्लंडला 2019 वनडे वर्ल्डकप जिंकून देणआर इयोन मॉर्गनही दोन देशांकडून खेळला आहे. इंग्लंड आधी आयर्लंडकडून खेळला आहे.
एड जॉयस इंग्लंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांसाठी खेळला आहे. 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून खेळला. त्यानंतर आयर्लंड संघात गेला.
गॅरी बॅलेंस इंग्लंड आणि झिम्बाब्वे संघासाठी खेळला आहे. याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला.