11 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या निमित्ताने टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा माजी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहे.
विराटने 9 डावांमध्ये 85.80 च्या सरासरीने आणि 132 च्या स्ट्राईक रेटने 429 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या स्थानी आहे. रिझवानने 56.20 च्या सरासरीने 117.57 च्या स्ट्राईक रेटने एकूण 3 अर्धशतकांच्या मदतीने 281 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा 9 डावांमध्ये 271 धावा करण्यासह तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने 30.11 च्या सरासरीने आणि 141.14 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्यात. रोहितने या दरम्यान 2 अर्धशतकं ठोकली आहेत.
हाँगकाँगचा बाबर हयात चौथ्या स्थानी आहे. हयातने 5 डावात 47 च्या सरासरीने आणि 146.87 च्या सरासरीने एकूण 235 धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तानचा फलंदाज इब्राहीम झद्रान 5 डावात 196 धावा करण्यासह पाचव्या स्थानी आहे. झद्रानने 104.25 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.