ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्यांदा टीम इंडियाचे स्वप्न तोडलं

19 November 2023

Created By: Rakesh Thakur

ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला.

ट्रॅव्हिस हेड या विजयाचा हिरो ठरला. त्याने 120 चेंडूत 137 धावांची खेळी केली.

हेडने 2023 या वर्षात दुसऱ्यांदा टीम इंडियाचे स्वप्न भंग केलं आहे.

पाच महिन्यांपूर्वीही हेडने भारताला असाच घाव घातला होता.

ट्रॅव्हिस हेडने डब्ल्यूटीसी फायनलमध्येही भारताविरुद्ध अशीच खेळी खेळली होती.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला.

त्या सामन्याच्या पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने 163 धावा केल्या होत्या.