5 सप्टेंबर 2025
Created By: राकेश ठाकुर
आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान, युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात तिरंगी मालिका सुरु आहे. यात युएईच्या गोलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली.
पाकिस्तान आणि युएई यांच्या शारजाहमध्ये सामना खेळला गेला. यात युएईच्या वेगवान गोलंदाज जुनैद सिद्दीकीला फक्त एकच विकेट मिळाली.
एका विकेटमुळे त्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. या विकेटसह जुनैद सिद्दीकीने टी20 क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केलं आहे.
जुनैदने युएईसाठी टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. असोसिएट संघाकडून 100 विकेट घेणारा आठवा गोलंदाज ठरला आहे.
जुनैद सिद्दीकी युएईसाठी आतापर्यंत 74 टी20 सामने खेळला आहे. तसेच 59 वनडे सामन्यात 76 विकेट घेतल्या आहेत.
जुनैद आशिया कप स्पर्धेतही संघाचा भाग हे. पण त्याचा फॉर्म काही खास नाही. तिरंगी मालिकेत त्याने तीन सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या.
आशिया कप स्पर्धेत युएईचा पहिला सामना 10 सप्टेंबरला भारताविरुद्ध होणार आहे.