अँजेलो मॅथ्युज प्रकरणात पंचांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

Created By:Rakesh Thakur

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजला वेळेवर तयार न झाल्यामुळे 'टाईम आऊट' देण्यात आले.

शाकिब अल हसनच्या क्रीडा भावनेवर यामुळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

चौथे पंच होल्डस्टॉक म्हणाले की मॅथ्यूजने आधीच उशीर केला होता आणि त्यानंतरच हे अपील करण्यात आले.

नवीन फलंदाजाने 2 मिनिटांत चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.

हेल्मेटचा मुद्दा समोर येण्यापूर्वीच मॅथ्यूजची 2 मिनिटे उलटून गेली होती आणि तो तयार नव्हता.

संपूर्ण प्रक्रियेवर टीव्ही अंपायर लक्ष ठेवतात. फलंदाज बाद झाल्यानंतर 2 मिनिटांचा टायमर सुरू करतो.

अशा परिस्थितीत जर फलंदाज तयार नसेल तर टीव्ही अंपायर मैदानावरील पंचांना याची माहिती देतो.

पण यासाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारालाच अपील करावे लागते, असंही पंचांनी स्पष्ट केले.