ऋषभ पंतच्या मागे पुन्हा एका उर्वशी रौतेलाचं सावट! आता केलं असं..

4 जून 2024

Created By : राकेश ठाकुर

उर्वशी रौतेलाचं क्रिकेट प्रेम कोणापासूनही लपलेलं नाही. ती पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताना चीयर करताना दिसेल. 

उर्वशी रौतेला न्यूयॉर्कला गेली आहे. उर्वशीने आपल्या इंस्टास्टोरीमध्ये ही बातमी अपडेट केली आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध आहे. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तानशी खेळेल. 

उर्वशी रौतेला या सामन्यात प्रोत्साहन देताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. विशेष म्हणजे ऋषभ पंतचं संघात पुनरागमन झालं आहे. 

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत एकेकाळी चांगले मित्र राहिले आहेत. आता न्यूयॉर्कमध्ये पंतच्या फलंदाजीचा आनंद घेईल.

उर्वशी रौतेलाने आयसीसी वर्ल्डकप 2023 चषकाचं पॅरिसमध्ये लाँचिंग केलं होतं. पण तेव्हा पंत खेळला नव्हता. 

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पंतचा खेळणं निश्चित आहे. सध्या फॉर्मातही आहे. सराव सामन्यात अर्धशतकही ठोकलं आहे.