12 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
रोहित-विराटने टी 20i-कसोटीतून निवृत्ती घेतलीय. त्यानंतर ही जोडी वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
या दरम्यान अंडर 19 टीममधील युवा भारतीय फंलदाज वैभव सूर्यवंशी याच्या कोचने प्रतिक्रिया दिलीय.
वरिष्ठ खेळाडू निवृत्त होतायत. त्यामुळे संघात पोकळी तयार होतेय. त्या जागेसाठी बीसीसीआय युवा खेळाडूंना तयार करत आहे, असं वैभवच्या हेड कोचने म्हटलं.
वैभव सूर्यवंशी याची वेळ आल्यावर त्यालाही बीसीसीआयकडून भारतीय वरिष्ठ संघात संधी मिळेल, असा विश्वास वैभवच्या कोचने व्यक्त केला.
वैभवने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. वैभव व्हाईट बॉल सीरिजमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
वैभवने आयपीएल 2025 मध्ये अवघ्या 35 चेंडूत स्फोटक शतक करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. वैभवने त्या खेळीत 11 षटकार लगावले होते.
वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये आरआर अर्थात राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करतो.