11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

'12TH फेल' चित्रपट दिग्दर्शकाच्या मुलाची चमकदार कामगिरी

22 January 2024

Created By: Rakesh Thakur

'12TH फेल' चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. विधू विनोद चोप्राचा मुलगा अग्नि चोप्राने रणजी ट्रॉफीत सलग तिसरं शतक झळकावलं. 

रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या अग्नि चोप्राने 3 सामन्यात 3 शतकं झळकावली आहेत. प्रत्येक सामन्याच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली आहे. 

अग्निने अरुणाचल प्रदेश विरुद्ध तिसरे शतक झळकावले आणि मिझोरमला पहिला विजय मिळवून दिला.

25 वर्षीय अग्नि चोप्राने 3 सामन्यामध्ये 93.50 च्या सरासरीने 72 चौकार आणि 14 षटकारांच्या मदतीने 561 धावा केल्या. 

अग्नि चोप्रा यापूर्वी मुंबईसाठी खेळत होता. मात्र पुरेशी संधी मिळत नसल्याने मिझोरम संघात सहभागी झाला. 

अग्निने मिझोरमकडून लिस्ट ए आणि टी20 स्पर्धेत पदार्पण केलं आहे. हजारे ट्रॉफीच्या 7 सामन्यात अग्निने 174 धावा केल्या आहेत. 

रणजी ट्रॉफीमध्ये सिक्कीमविरुद्ध पहिल्या सामन्यात शतक झळकावलं होतं. त्यानंतर नागालँडविरुद्ध दुसरं शतक झळकावलं.