आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू कोण?

24 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.  यंदा ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. 

टी 20 फॉर्मेटमधून विराट कोहली निवृत्त झाला. त्यामुळे विराट या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. मात्र त्यानतंरही विराटचा मोठा विक्रम मोडीत निघणार नाही.

विराट या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे. 

विराटने आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात (Odi-T20i) एकूण 27 सामन्यांमध्ये 7 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला. विराटने या स्पर्धेत वनडे फॉर्मेटमधील शेवटचा पुरस्कार पाकिस्तान विरुद्ध 2023 मध्ये जिंकला होता.

विराटने त्याआधी 2022 साली टी 20 फॉर्मेटने झालेल्या स्पर्धेत पहिलंवहिलं शतक केलं होतं. विराट तेव्हाही मॅन ऑफ द मॅच ठरला होता.

विराटनंतर या यादीत सनथ जयसूर्या आणि शोएब मलिक हे माजी ऑलराउंडर संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. या दोघांनी प्रत्येकी 5-5 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. 

तसेच रोहित शर्मा, शिखर धवन, नवजोत सिद्धू आणि सुरेश रैना या चौघांनी प्रत्येकी 3-3 वेळा सामनावीर होण्याचा बहुमान मिळवला आहे.

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय