15 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा अनुभवी आणि विस्फोटक फलंदाज याने असंख्य विक्रम केले आहेत. विराटने त्यापैकी स्वातंत्र्य दिनी खास कारनामा केला आहे.
विराट स्वातंत्र्य दिनी शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. विराटने 2019 साली वेस्टइंडिज दौऱ्यात ही कामगिरी केली होती.
विराटने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 14 चौकारांच्या मदतीने 114 धावांची खेळी केली होती.
विराटने 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनीही शतक ठोकलं आहे. विराटने 2012 साली एडलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात हे शतक केलं होतं.
विराटने एडलेडमध्ये 116 धावा केल्या होत्या. मात्र भारताचा त्या सामन्यात पराभव झाला होता.
विराट अशाप्रकारे स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. विराटसाठी हा रेकॉर्ड निश्चितच खास असणार.
विराटने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतलीय. विराट ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसू शकतो.