15 मार्च 2025

विराट कोहली हळू हळू कोणापासून लांब होतोय?

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहते खूश आहेत. असं असूनही एक प्रश्न मनात घर करून आहे.

भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीने इतर खेळाडूंप्रमाणे सोशल मीडियावर कोणतीच पोस्ट केली नाही? यामुळे चाहते संभ्रमात आहेत. 

टीमच्या विजयानंतर कोहलीने काही कंपन्यांचे प्रमोशनल व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. 

आरसीबीच्या इव्हेंटमध्ये एक चाहत्याने केलेली तक्रार विराट कोहलीपर्यंत पोहोचली. तेव्हा त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं. 

विराट कोहलीने सांगितलं की, तसं काही पोस्ट केल्याने आनंद पहिल्यापेक्षा वाढणार नाही आणि यामुळे टीमला दोन ट्रॉफी जिंकण्यात मदतही होणार नाही.  

विराट कोहलीने सांगितलं की, जेव्हा काही पोस्ट करतो तेव्हा त्याला आश्चर्यकारक प्रतिक्रिया मिळतात. 

त्यामुळे जाणीवपूर्णक सोशल मीडियावर कमी पोस्ट करतो आणि सर्वांपासून थोडं अंतर ठेवतो.