दुलीप ट्रॉफीची चर्चा असताना विराट कोहलीचं ट्वीट आलं समोर
12 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडिया सध्या मोठ्या विश्रांतीवर आहे. आता थेट 19 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
दरम्यान, टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.
दुलीप ट्रॉफी स्पर्धा 5 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान आहे. विराट-रोहित या स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीने 12 वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट खेळलेला नाही. जर आता खेळला तर स्पर्धा खास असेल.
असं असताना विराट कोहलीचं एक ट्वीट समोर आलं आहे. यात दुलीप ट्रॉफीसाठी मला शुभेच्छा द्या, असं ट्वीट केलं होतं.
विराट कोहलीने शेवटची दुलीप ट्रॉफी 2010 मध्ये खेळली होती. तेव्हा 56 धावा केल्या होत्या.
दुलीप ट्रॉफीत चार संघ भाग घेतील. इंडिया ए, बी, सी आणि डी संघ असतील. खेळाडूंची निवड बीसीसीआय निवड समिती करेल.