धोनी की विराट! 2023-24 यापैकी कोणी भरला 66 कोटींचा इनकम टॅक्स?

4 सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

विराट कोहली आणि एमएस धोनी जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. हे दोन्ही खेळाडू वर्षाला कोट्यवधी रुपये कमवतात. 

विराट कोहली आणि धोनी या देशात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या लोकांपैकी आहेत. मागच्या आर्थिक वर्षात या दोघांनी सर्वाधिक टॅक्स भरला आहे. 

फॉर्च्युन इंडियाच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीने एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षात 66 कोटी रुपये टॅक्स भरला.

मागच्या आर्थिक वर्षात विराट कोहली सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू ठरला आहे. त्याने एमएस धोनीलाही मागे टाकलं आहे. 

एमएस धोनीने मागच्या आर्थिक वर्षात 38 कोटींचा टॅक्स भरला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मागच्या आर्थिक वर्षात 28 कोटी टॅक्स भरला आहे. सचिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

सौरव गांगुलीने मागच्या आर्थिक वर्षात 23 कोटी, हार्दिक पांड्याने 13 कोटी, तर ऋषभ पंतने 10 कोटी टॅक्स भरला आहे.