वनडेत कोहलीला नंबर होण्याची संधी, फक्त इतकं करावं लागणार
1 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
रनमशिन्स विराट कोहलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दित अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
टी20 क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर विराट कोहली फक्त वनडे आणि कसोटी सामने खेळताना दिसणार आहे.
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहली एका मोठ्या विक्रमाच्या वेशीवर आहे. भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा मान मिळणार आहे.
विराट कोहलीने 2008 पासून आतापर्यंत 292 वनडे सामने खेळला आहे. तसेच 151 झेल पकडले आहेत.
विराट कोहलीने एका सामन्यात तीन झेल घेण्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत 6 झेल घेताच भारताकडून सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरेल.
मोहम्मद अझरुद्दीन सध्या पहिल्या स्थानावर असून त्याने 334 सामन्यात 156 झेल पकडले आहेत.