आयपीएलमध्ये 55 कोटी कमवणाऱ्या खेळाडूने आपल्याच संघाला केलं पराभूत

20 June 2024

Created By: राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत इंग्लंडने वेस्ट इंडिजला 8 गडी राखून पराभूत केलं. 

वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं 181धावांचं आव्हान इंग्लंडने 15 चेंडू राखून पूर्ण केलं. 

वेस्ट इंडिजच्या पराभवाचं मोठं कारण निकोलस पूरन ठरला. त्याच्या चुकीचा संघाला फटका बसला.

निकोलस पूरनने तिसऱ्या षटकात फिल सॉल्टचा झेल सोडला. तेव्हा सॉल्ट फक्त 7 धावांवर होता. 

निकोलस पूरनने मोईन अलीचाही झेल सोडला. त्याच्या कामगिरीमुळे वेस्ट इंडिजचं नुकसान झालं. 

फिल सॉल्टने जीवदान मिळाल्यानंतर नाबाद 80 धावा केल्या आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. 

निकोलस पूरन आयपीएलमध्ये कोट्यवधींची कमाई करतो. आतापर्यंत त्याने 55 कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत.