आयपीएल स्पर्धेत खेळाडूच्या बॅटची तपासणी, काय आहे आयसीसीचा नियम?

14 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

आयपीएल स्पर्धेत यावेळी पंच फलंदाजांची बॅटची तपासणी करताना दिसत आहेत. पंच एका टूलच्या माध्यमातूनत बॅटची जाडी तपासतात. हा नियम आयसीसीने केला आहे.

फलंदाजाच्या बॅटची तपासणी टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये केली जाते. पण यावेळी हे काम पंच मैदानात करत आहेत. 

फलंदाजला नियमानुसारच बॅटचा वापर करू शकतो. बॅटची जाडी आणि लांबीसाठी आयसीसीचा नियम आहे. 

आयसीसीने मध्यभागाची जाडीही निश्चित केली आहे. मध्यभागाची जाडी 6.7 सेमी (2.64 इंच) पेक्षा जास्त नसावी. 

बॅटचा काठ आयसीसीच्या नियमानुसार, 4 सेमी (1.56 इंच) पेक्षा जास्त नसावा. 

आयसीसी नियमानुसार, बॅटची उंची 96.4 सेमी (38इंच) पेक्षा जास्त ठेवू शकत नाही. जर अशी चूक केली तर कारवाई केली जाईल. 

कोण आहे अभिषेक शर्माची रुमर्ड गर्लफ्रेंड? किती श्रीमंत?