विराट कोहली दोन रंग असलेली बॅट वापरण्याचं कारण काय? जाणून घ्या
16 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
विराट कोहली क्रिकेटविश्वातील मोठं नाव आहे. त्याला रनमशिन्स म्हणून संबोधलं जातं. त्याच्याकडून बॅट घेण्याची इच्छा अनेक क्रिकेटपटूंची असते.
विराट कोहलीची बॅटची वेगळीच खासियत आहे. त्याच्या वजनापासून ते बॅलेंसपर्यंत सर्वकाही त्याच्या मनासारखं असतं.
विराट कोहलीने वेगवान गोलंदाज आकाश दीपला एक बॅट गिफ्ट दिली होती. त्यावर दोन रंग होते. असं असण्याचं कारण समजून घ्या.
विराट कोहलीच्या बॅटचा बाहेरचा भाग डार्क ब्राउन, तर मधला भाग हलक्या ब्राउन रंगाचा होता.
विराट कोहलीच्या बॅटमध्ये दोन रंगाच्या बॅटचा समावेश असतो. याला हार्ड इंग्लीश विलो आणि सॉफ्ट इंग्लीश विलो बोललं जातं.
हार्ड विलोमुळे बॅट लवकर तुटत नाही आणि सॉफ्ट विलोमुळे चांगले शॉट्स लागतात.
विराट कोहलीची बॅट खूपच महाग आहे. त्याची किंमत एक लाख ते दीड लाखांच्या दरम्यान असते.