कोण आहेत पार्थ जिंदल? सॅमसन बाद झाल्यानंतर रिॲक्शन होत आहे व्हायरल

8 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

आयपीएल स्पर्धेत दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात संजू सॅमसनच्या विकेटवरून वाद झाला. मात्र त्यानंतर एक व्यक्ती चर्चेत आली. 

बाद दिल्यानंतर सॅमसन पंचांशी वाद घालत होता. तेव्हा व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये बसलेले दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल ओरडू लागले. 

त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक जण पार्थ जिंदल बाबत जाणू इच्छित आहे. नेमके कोण आहेत? 

पार्थ जिंदल ही काही सामान्य व्यक्ती नाही. भारतातील सर्वात मोठ्या बिझनेस कुटुंबातील सदस्य आहे. सज्जन जिंदल यांचे पूत्र आहेत. 

32 वर्षांचे पार्थ हे जिंदल ग्रुप कंपनीच्या जेएसडब्ल्यू सिमेंट्स आणि जेएसडब्ल्यू पेंट्सचा मॅनेजिंक डायरेक्टर आहे. त्याची नेटवर्थ 600 कोटी रुपयांहून अधिक आहे. 

पार्थ जिंदल हे जेएसडब्ल्यू स्पोर्टचे डायरेक्टरही आहेत. तसेच आयपीएल डब्ल्यूपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि आयएसएलमध्ये फुटबॉल बंगळुरु एफसीचे मालक आहेत.

पार्थ जिंदल इंस्पायर इंस्टीट्यूट ऑफ स्पोर्टचे डायरेक्टरही आहेत. ही इंस्टिट्यूट ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रासारख्या दिग्गज भारतीय एथलीटना स्पॉन्सर करते.