इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारा भारतीय कर्णधार कोण?

19 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पहिला कसोटी सामना सुरु होत आहे. 

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहेत. 

इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे या मालिकेत काय होतं याकडे लक्ष आहे. 

इंग्लंडमध्ये फक्त तीन भारतीय कर्णधारांनी कसोटी मालिका जिंकली आहे. 

इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याचा मान विराट कोहलीकडे आहे. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडने 3 कसोटी सामने जिंकले आहेत. 

विराट कोहलीनंतर कपिल देव यांच्या नेतृत्वात 2 कसोटी सामने जिंकले आहेत. 

धोनी, गांगुली, द्रविड आणि अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडमध्ये प्रत्येकी एक कसोटी सामना जिंकला आहे. 

ज्या संघाने 'टाइम आउट' केलं, त्याच संघाने निरोप देताना मन जिंकलं