14 मार्च 2025
आयपीएल 2025 स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार कोण? जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. दहा संघांनी आपले कर्णधार जाहीर केले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सने सर्वात शेवटी अक्षर पटेलकडे कर्णधारपद सोपवलं आहे.
अक्षर पटेल 31 वर्षांचा असून आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवणारा पाचवा युवा कर्णधार आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत शुबमन गिल हा सर्वात युवा कर्णधार आहे. त्याचं वय 25 वर्षे आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतचं वय 27 आहे. शुबमननंतर दुसरा युवा कर्णधार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचं वय 28 आहे.
या स्पर्धेत सर्वात वयस्कर कर्णधार हा अजिंक्य रहाणे आहे. त्याचं वय 36 असून कोलकात्याचं कर्णधारपद भूषवणार आहे.