वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर, जाणून घ्या
2 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान न्यूझीलंडच्या सूजी बेट्सकडे आहे. तिने 36 सामन्यात 1066 धावा केल्यात.
दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग आहे. तिने 35 सामन्यात 992 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली या यादीत तिसऱ्या स्थानावर असून तिने 941 धावा केल्या आहेत.
भारताची मिताली राज या यादीत चौथ्या स्थानी आहे. तिने 24 सामन्यात 726 धावा केल्या आहेत.
पाचव्या स्थानावर कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. तिने 35 सामन्यात 576 धावा केल्या आहेत.
स्मृती मंधाना सध्या चांगल्या फॉर्मात आहे. यावेळी तिला या यादीत पुढे जाण्याची संधी आहे.
स्मृतीने 21 सामन्यात 449 धावा केल्या आहेत. या वर्ल्डकपमध्ये 500 पार धावा करण्याची संधी आहे.