अनुष्का शर्माला राग का आला? मैदानात नेमकं काय घडलं?

13  June 2024

Created By:  Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकपच्या सलग तीन सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया सुपर 8 फेरीत पोहोचली आहे. 

अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात ती खूपच रागावलेली दिसत आहे. 

भारत पाकिस्तान सामन्यात अनुष्का शर्मा रागाने भरलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगत होते. 

अनुष्का शर्मा नेमकं का रागावली होती? याचं उत्तर काही मिळालेलं नाही. पण सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

विराट कोहली टी20 वर्ल्डकपच्या तिन्ही सामन्यात फेल गेला. तीन सामन्यात एकूण 5 धावा केल्या आहेत. 

विराट कोहलीला ओपनिंगला उतरवण्याचा निर्णय चुकीचा ठरताना दिसत आहे.

भारताचा शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला होणार आहे. या सामन्यात विराटच्या कामगिरीवर लक्ष असेल.