सरफराज खानचं नाव घेत दिग्गज खेळाडूने का मागितली माफी?
18 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
सरफराज खानने पुन्हा एकदा फलंदाजीत कमाल केली. न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतकी खेळी केली.
सरफराजने बंगळुरु कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नाबाद 70 धावांची खेळी केली. तर विराटसोबत शतकी भागीदारी केली.
सरफराज खान फलंदाजी करत असताना दिनेश कार्तिकने त्याची आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागितली.
कार्तिकने समालोचन करताना सांगितलं की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची सरासरी जवळपास 60 आहे. पण हा आकडा 70च्या जवळपास होता.
कार्तिकने सांगितलं की, सरफराज आणि त्याच्या चाहत्यांची माफी मागतो. कारण त्याची सरासरी 70च्या आसपास आहे.
टीम इंडियाला सरफराज खानकडून फार अपेक्षा आहेत. चौथ्या दिवशी सरफराज खानने मोठी खेळी केल्यास टीम इंडियाला फायदा होऊ शकतो.
तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 3 गडी गमवून 231 धावा केल्या आहेत. अजूनही न्यूझीलंडकडे 125 धावांची आघाडी आहे.