1 मार्च 2025

युवराज सिंगच्या पत्नीला का बदलावं लागलं आपलं नाव? कारण की..

युवराज सिंगच्या पत्नीचं नाव हेजल कीच आहे. ती बॉलिवूड अभिनेत्री असून सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटातून नावारूपास आली होती. 

युवराज सिंगसोबत काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2015 मध्ये साखरपुडा केला आणि 2016 मध्ये लग्न केलं. 

युवराज सिंगसोबत लग्न करण्यासाठी हेजल कीचला आपलं नाव बदलावं लागलं होतं.

शीख परंपरेनुसार युवराज सिंगशी लग्न करण्यासाठी हेजल कीचला आपलं नाव बदलावं लागलं.

शीख परंपरेच्या 'आनंद कारज' समारंभात संत बलविंदर सिंह यांनी सूचवल्याप्रमाणे नाव दिलं गेलं. तिचं नाव गुरबसंत कौर ठेवलं गेलं. पण युवराज तिला हेजल नावानेच हाक मारतो. 

हेजलचे वडील एक ब्रिटीश नागरीक आहे. तिची आई मॉरिशसमध्ये जन्मली होती. पण हिंदू असून बिहारची आहे.

युवराज आणि हेजलच्या लग्नाला 9 वर्षे झाली. या दांपत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.