तारक मेहता का उल्टा चष्मा सीरीयलमधील  रोशन सिंह सोढी  सध्या बेपत्ता आहे. 

10 वर्षापेक्षा अधिक काळ गुरुचरण सिंहने तारक मेहता शो मध्ये काम केलं. मागच्या 8 दिवसापासून त्याचा  शोध लागत नाहीय.

गुरुचरण सिंहने रोशन सिंह सोढीचा रोल प्ले केला होता. एनर्जीने भरलेला त्याचा रोल प्रेक्षकांना भरपूर आवडलेला.

या रोलने त्याला ओळख दिली. 12 वर्ष काम केल्यानंतर 2020 मध्ये सोढी तारक मेहता शो मधून बाहेर पडला.

तारक मेहता खूप वर्ष चालणारी सीरीयल आहे. या शो मधील कलाकारांनी बरीच वर्ष  एकत्र काम केलं.

वडिलांच ऑपरेशन झाल्यामुळे शो सोडावा लागला, असं गुरुचरण सिंहने सांगितलेलं.

शो सोडण्यामागे अनेक कारण होती. पण गुरुचरण सिंहने कुठल्याही कारणाचा  खुलासा केला नाही.