रोहित शर्मा-विराट कोहली देशांतर्गत क्रिकेट का खेळत नाहीत? जय शाह म्हणाले..
15 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
श्रीलंका दौरा संपल्यानंतर टीम इंडिया 43 दिवसांच्या मोठ्या ब्रेकवर आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफीत खेळत आहेत.
दुलीप ट्रॉफीसाठी बीसीसीआयने चारही संघ जाहीर केले आहेत. पण रोहित शर्मा-विराट कोहली या संघात नाहीत.
रोहित-कोहली या स्पर्धेत खेळणार अशी माहिती आधी समोर आली होती. पण त्यानंतर त्यांना आराम दिला गेला.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं की, या दोघांवर जास्त ताण देणं योग्य ठरणार नाही. दुखापत होऊ शकते.
'आपण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडे पाहिलं पाहीजे. त्यांचे वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत.', असं जय शाह म्हणाले.
'आपल्याला खेळाडूंसोबत सन्मानाने वागलं पाहीजे. त्यांना नोकरांसारखं वागवता कामा नये.' असं जय शाह म्हणाले.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे 5 ते 19 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.