T20 वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा. स्फोटक फलंदाज रिंकू सिंहची 15 सदस्यीय टीममध्ये निवड नाही.

रिंकूला रिझर्व्ह 4 मध्ये स्थान. त्याच्याजागी आक्रमक  फलंदाज शिवम दुबेची मुख्य  टीममध्ये निवड. 

दोघांमध्ये काय फरक आहे? रिंकूच्या जागी शिवम दुबेची निवड का झाली?  याचं खास कारण आहे. 

दुबे ऑलराऊंडर आहे. तो आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजी करत नाहीय. पण तो मध्यमगती गोलंदाज आहे.

दुबे पावरहिटर आहे. स्पिनर्स विरुद्ध 60 डावात 143 च्या स्ट्राइक रेटने 667 धावा केल्यात.

रिंकूचा स्पिनर्स विरुद्ध स्ट्राइक रेट 119 चा आहे. 16-20 ओव्हर्समध्ये स्ट्राइक  रेट 152 आहे.

दुबेने चालू सीजनमध्ये 172 च्या स्ट्राइक रेटने 350 धावा केल्यात. रिंकूने 150 च्या स्ट्राइक रेटने 123 धावा केल्यात.