आशिया कप 2023 स्पर्धेत कुलदीप यादव मालिकावीर
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत भारताने जेतेपदावर नाव कोरलं आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने आशिया कपवर नाव कोरलं आहे. या स्पर्धेत फिरकीपटू कुलदीप यादव हीरो ठरला.
कुलदीप यादव याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने 5 सामन्यात 9 विकेट घेतले. तसेच एका डावात 5 गडी बाद करण्याची किमया साधली.
या स्पर्धेत चार गोलंदाजांनी कुलदीप पेक्षा जास्त विकेट घेतले आहेत. मग त्यांना का हा पुरस्कार मिळाला नाही?
कुलदीप यादव याने 5 सामन्यात 9 विकेट घेतले. यावेळी त्याची सरासरी जवळपास 11 आणि इकॉनोमी 4 हून कमी होती.
या स्पर्धेतील सर्वात चांगली सरासरी आणि इकॉनोमी होती. दुसरीकडे, श्रीलंकेच्या पथिरानाने 11 विकेट घेतले आहेत.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी कुलदीप यादव फॉर्मात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाला नक्कीच फायदा होईल.
काळी साडी, तिरकी नजर, वहिनीसाहेबांचा हा लूक पाहिला आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा