पत्नी, छत्री आणि मी..! गौतम गंभीरची पोस्ट आली चर्चेत
27 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचं शेड्युल नसल्याने गौतम गंभीर सध्या पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
नुकताच पत्नीसोबत एक फोटो शेअर केला होता. तसेच बाहेर फिरायला जाणार असल्याची माहिती दिली होती.
गौतम गंभीरने एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो हातात छत्री घेऊन पावसात उभा असल्याचं दिसत आहे.
फोटो पोस्ट करताना गंभीरने लिहिलं की, जर जोडीदाराने पावसात बाहेर जायचं ठरवलं तर तु्म्हाला त्याच्या स्वागतासाठी बाहेर छत्री घेऊन थांबावं लागेल.
गौतम गंभीर बांगलादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियासोबत येईल. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाची आहे.
गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यात टी20 आणि वनडे मालिकेत प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली आहे.
गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टी20 मालिकेत विजय, तर वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.