Asia Cup 2025 : सूर्यकुमार रोहितची विजयी परंपरा कायम राखणार? 

19 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

भारतीय क्रिकेट संघाला आतापर्यंत 5 कर्णधारांनी एकूण 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकून दिली आहे.

सुनील गावसकर यांनी भारताला 1984 साली पहिल्यांदा आशिया चॅम्पियन केलं होतं.

दिलीप वेंगसरकर यांनी गावसकर यांच्यानंतर 1988 साली भारताला एकूण दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकवून दिली होती.

मोहम्मद अझरुद्दीन यांनी भारताला 1992 आणि 1995 साली आशिया कप जिंकून दिला होता.

अझरुद्दीन यांच्यानंतर महेंद्रसिंह धोनी याने 2010 आणि 2016 साली आशिया कपचा खिताब जिंकून दिला होता.

रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 2018 आणि  2023 मध्ये आशिया चॅम्पियन केलं.  मात्र यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. तर रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्याकडे कर्णधारपद आहे.

यंदा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आता सूर्याच्या खांद्यावर भारताला आशिया कप ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी आहे.

अनाया बांगर दिसणार नव्या भूमिकेत, अखेर घेतला मोठा निर्णय