19 फेब्रुवारी 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीत 21 वर्षानंतर लागलं असं शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या विल यंगने शतकी खेळी केली.
विल यंगने पाकिस्तानविरुद्ध 113 चेंडूत 107 धावा केल्या. यात 12 चौकार आणि एक षटकार होता.
विल यंगचं हे ऐतिहासिक शतक असण्याचं कारण की, 21 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडकडून शतकी ठोकलं गेलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत 21 वर्षानंतर न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजाने शतक ठोकलं. 2004 मध्ये नाथन एस्टल अशी कामगिरी केली होती.
विल यंग हा न्यूझीलंडचा चौथा खेळाडू असून त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी शतक ठोकलं आहे. तर याच सामन्यात लॅथमने शतक ठोकत सहावा खेळाडू ठरला.
विल यंगने चौथ्यांदा वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. पण आशियात पहिलच शतक आहे.
विल यंग हा लॅथमनंतर कराचीत सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे. लॅथमने नाबाद 118 धावा केल्या.