'वर्ल्डकप जिंकणं सोपं आहे..' मोदींसमोर रोहित शर्माने असं का सांगितलं?

5 July 2024

Created By: Rakesh Thakur

टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी आणि 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप जिंकला.

जेतेपदानंतर मायदेशी परतलेल्या टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या चर्चेत कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकप जेतेपदाबाबत केलेलं वक्तव्य खूप खास होतं. 

पंतप्रधान मोदींनी रोहितला 2007 आणि 2004 वर्ल्डकप बाबत विचारलं. कारण रोहित दोन्ही संघात होता. 

रोहित शर्मा 2007 साली खूपच लहान होता. तेव्हाही मुंबईत संघाचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं होतं.

रोहित शर्माने सांगितलं की, 2007 वर्ल्डकप विजयानंतर 2-3 दिवसात वाटलं होतं की वर्ल्डकप जिंकणं सोपं आहे.

रोहितने पुढे सांगितलं की, आता याची खात्री पटली की हे खूपच कठीण आहे. त्यामुळे 2024 विजय खूप खास आहे.