भारतीय कर्णधार अनसोल्ड, या मोठ्या स्पर्धेतून पत्ता कट

2 सप्टेंबर 2024

Created By: संजय पाटील

वूमन्स बिग बॅश लीग स्पर्धेला काही दिवसांनी सुरुवात होणार, स्पर्धेसाठी सर्व टीमकडून स्क्वॉड तयार करायला सुरुवात 

यंदाच्या वूमन्स बिग बॅश लीग स्पर्धेत एकूण 6 भारतीय, स्मृती मानधना हीचाही समावेश

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर ही यंदा या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही

हरमन विदेशी ड्राफ्टमध्ये होती, मात्र हरमनप्रीतला कुणीच घेतलं नाही, हरमन गेल्या काही हंगामात खेळली होती

मेलबर्न रेनेगेड्स या संघाकडे आपली जुनी खेळाडू हरमनला आपल्या गोटात घेण्याची संधी  होती, मात्र त्यांनीही तिला घेतलं नाही

स्मृती व्यतिरिक्त या स्पर्धेत दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, शिखा पांडे, यास्तिका भाटीया आणि हेमलता दयालन या देखील सहभागी होणार आहेत

स्मृती मानधना एडलेड स्ट्रायकर्स संघांचं प्रतिनिधित्व करणार,स्मृतीला प्री सीजन ड्राफ्टद्वारे संघात घेतलं गेलं