वुमन्स प्रीमिअर लीग 2024 साठी डिसेंबर महिन्यात होणार लिलाव

09 November 2023

Created By: Rakesh Thakur

वुमन्स प्रीमियर लीगच्या 2024 पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव 9 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

शिल्लक रकमेव्यतिरिक्त सर्व पाच संघांना 1.5 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाईल.

नऊ विदेशी खेळाडूंसह 30 स्लॉट लिलावात भरले जातील.

संघांनी एकूण 60 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. या 60 खेळाडूंपैकी 21 विदेशी खेळाडू आहेत.

पाच संघांनी 29 खेळाडूंना त्यांच्या संघातून मुक्त करण्यात आले.

पहिल्या पर्वात प्रत्येक संघाला त्यांचे संघ तयार करण्यासाठी 12 कोटी रुपये देण्यात आले होते.

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे दोनच संघ या पैशाचा पुरेपूर वापर करू शकले.

गेल्या वर्षीच्या लिलावात सात खेळाडूंवर 2 कोटी रुपयांपर्यंत बोली, तर तिघांनी तीन कोटींचा टप्पा ओलांडला होता.