टीम इंडिया विरुद्ध न्यूजीलंड सामन्यात 'या' गोष्टींवर बंदी

14 November 2023

Created By: Chetan Patil

वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनलचा सामना आज पार पडणार आहे

या सामन्याकडे संपूर्ण भारतीयांची आशा आहे

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे

या सामन्यासाठी सुरक्षेची पूरेपूर काळजी घेण्यात आलीय

सामन्यादरम्यान स्टेडीयमच्या आत आणि बाहेर मुंबई पोलीस दलाचे 120 अधिकारी आणि 600 पोलीस कर्मचारी तैनात असतील

याशिवाय SRPF ची टीमही तैनात असेल

हा सामना पाहण्यासाठी स्टेडीयमध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांना सोबत पाण्याच्या बाटली, खाद्य पदार्थ, मोबाईल वगळता इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास बंदी असेल

याशिवाय पेन आणि पेन्सिल घेऊन जाण्यास बंदी असेल