पाच खेळाडूंची चांदी, बेस प्राईसच्या कित्येक पट मिळाले 

9  December 2023

Created By: Rakesh Thakur

वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी मिनी ऑक्शन पार पडलं.

WPL 2024 लिलावात पाच खेळाडूंची जोरदार चर्चा रंगली. बेस प्राईसच्या कित्येक पट रक्कम मिळाली.

मिनी ऑक्शनमध्ये तीन विदेशी, तर दोन भारतीय खेळाडूंना कोट्यवधींची रक्कम मिळाली. 

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू अन्नाबेल सुथरलँड हीला 2 कोटी रुपये देऊन दिल्ली कॅपिटल्सने घेतलं. 

कश्वी गौतम या अनकॅप्ड भारतीय खेळाडूला 2 कोटी मोजून गुजरात जायंट्सने घेतलं.

वृंदा दिनेश या अनकॅप्ड भारतीय खेळाडूला 1.30 कोटी देत युपी वॉरियर्सने संघात घेतलं. 

दक्षिण अफ्रिकेच्या शबनिम इस्माईल हिच्यासाठी मुंबई इंडियने 1.20 कोटी दिले. 

फोइबे लिचफिल्ड हीच्यासाठी गुजरात जायंट्सने 1 कोटी रुपयांची रक्कम दिली.