स्मृती मंधानाला 1 रनसाठी 2 लाख 36 हजार रुपये
11 मार्च 2025
WPL स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आरसीबीचा मुंबईवर 11 धावांनी विजय
बंगळुरुने या मोसमात 8 सामने खेळले, त्यापैकी 3 जिंकले तर 5 गमावले
कर्णधार स्मृती मंधानाची निराशाजनक कामगिरी, 7 सामन्यात 144 धावा
WPL 2025 मधील स्मृतीच्या एका धावेची किंमत ही 2 लाख 36 हजार
स्मृतीला WPL तिसऱ्या मोसमासाठी 3.4 कोटी रुपये मिळाले, तिने 144 धावा केल्या, त्यानुसार प्रत्येकी धावेसाठी 2.36 लाख रुपये
आरसीबी गतविजेता, मात्र यंदा आरसीबीची निराशाजनक कामगिरी
आरसीबीसाठी एलिस पैरीकडून सर्वाधिक धावा, एलिसने 7 सामन्यात 323 धावा केल्या