12 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हीस याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात शतक ठोकत इतिहास घडवला.
डेवाल्डने वयाच्या 22 वर्ष 105 व्या दिवशी शतक ठोकलं. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20i मध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.
टी 20i मध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम हा फ्रांसच्या गुस्ताव मीकॉन याच्या नावावर आहे. गुस्तावने 18 वर्ष 280 व्या दिवशी शतक केलं होतं.
आयसीसी पूर्णवेळ सदस्य संघाबाबत बोलायचं झाल्यास हा विक्रम हजरतुल्लाह झझाईच्या नावे आहे. हझरतुल्लाहने वयाच्या 20 वर्ष 337 दिवशी ही शतकी खेळी केली होती.
भारतासाठी सर्वात कमी वयात टी 20i शतक करण्याचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. यशस्वीने 21 वर्ष 279 व्या दिवशी हा कारनामा केला होता.
टीम इंडियाचा बॅट्समन तिलक वर्मा याने 22 वर्ष 5 व्या दिवशी टी 20i मध्ये शतक केलं होतं.
तसेच टी 20 मध्ये सर्वात कमी वयात शतक करण्याचा विक्रम हा वैभव सूर्यवंशी याच्या नावावर आहे. वैभवने 14 वर्ष 32 व्या दिवशी ही कामगिरी केली.