वडिलांच्या वक्तव्यानंतर युवराज सिंगची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत!
2 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
युवराज सिंगची इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. कारण त्याने पोस्टमधून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराज सिंगच्या वडिलांनी एका मुलाखतीत, धोनी आणि कपिल देव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाची चर्चा सुरु आहे.
युवराज सिंग याने या दरम्यान इशांतला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. लंबू जी..लंबू जी लिहून पोस्ट केली आहे.
2 सप्टेंबरला इशांत शर्माचा वाढदिवस असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त इशांतने शुभेच्छा दिल्या आहेत.
इशांत शर्माला शुभेच्छा देताना युवराज सिंगने लिहिलं की, वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा..माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम
युवराज सिंगने इशांत शर्मासाठी लंबू जी हा शब्द वापरला कारण की, टीम इंडियात तो याच नावाने प्रसिद्ध आहे.
युवराज सिंग आणि इशांत शर्माने भारतासाठी काही वर्षे एकत्र क्रिकेट खेळलं आहे.