अखेर स्वप्न झालं पूर्ण...! धनश्रीने दिली गुड न्यूज

31 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. 

धनश्री वर्मा डान्सर तर आहेच, पण आता गायिकाही झाली आहे. आता तिचं एक गाणं रिलीज होणार आहे. 

धनश्री वर्माने गाणं रेकॉर्ड केलं असून त्याचं नाव परदेसी कॉलिंग आहे. धनश्रीने व्हिडीओही शेअर केला आहे. 

धनश्रीचं हे गाणं संगीतकार सलीम मर्चेंटच्या स्टुडिओत रेकॉर्ड झालं. त्यांनी चक दे इंडिया, फॅशन सारख्या चित्रपटांना गाणी दिली आहेत. 

धनश्री डेंटिस्ट असून कोरिओग्राफरही आहे. नुकताच तिने झलक दिखला जा कार्यक्रमात भाग घेतला होता. 

धनश्रीचा पती युझवेंद्र चहल टी20 वर्ल्डकप संघात आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.