झहीर खानचं हे गुपित अद्याप कोणालाच माहिती नव्हतं!
298ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने आयपीएलमध्ये नवी इनिंग सुरु केली आहे.
आयपीएलमध्ये झहीर खान मुंबई इंडियन्ससोबत बरीच वर्षे होता. आता लखनौ सुपर जायंट्स सोबत आहे.
लखनौने झहीर खानला मेंटॉर केलं आहे. झहीर खान गौतम गंभीरची जागा घेणार आहे.
लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. संजीव गोयंका यांनी यावेळी झहीर खान याच्याशी निगडीत एक गुपित उघड केलं आहे.
झहीर खान मुंबई इंडियन्ससोबत पहिल्यांदा डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि नंतर हेड ऑफ ग्लोबल डेव्हलपमेंट या पदावर होता.
झहीर खान काही महिन्यांपूर्वी मुंबई इंडियन्सपासून वेगळा झाला आहे. पण याबाबत कुठेच वाच्यता केली नव्हती.
गोयंका यांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी झहीर मुंबईपासून वेगळा झाला आहे हे माहिती नव्हतं. जेव्हा कळलं तेव्हा त्याच्याशी संपर्क केला.