झहीर खान ठरवणार 100 कोटी कमवणाऱ्या खेळाडूचं भविष्य!

28ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

झहीर खानने आयपीएलमध्ये नवीन इनिंग सुरु केली आहे. झहीर खान लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर ठरला आहे. 

झहीर खान मेंटॉर होताच संघाबाबत मोठे निर्णय घेऊ शकतो. कर्णधाराचा मुद्दाही हाती असणार आहे. 

झहीर खान आयपीएलमध्ये 100 कोटी कमवणाऱ्या खेळाडूचं भविष्य ठरवू शकतो. 

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून केएल राहुल आहे. त्याने आयपीएलमध्ये 100 कोटी कमवले आहेत. लखनौने मागच्या तीन पर्वात एकूण 51 कोटी दिले.

केएल राहुलबाबत लखनौ सुपर जायंट्स व्यवस्थापनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

संजीव गोयंका यांनी केएल राहुल संघातील महत्त्वाचा खेळाडू असल्याचं सांगितलं आहे. पण कर्णधारपदाबाबत काहीच सांगितलं नाही.

संजीव गोयंका यांनी सांगितलं की, रिटेंशन नियमानंतर निर्णय घेतला जाईल. पण काहीही असो आता झहीर खान लखनौ संघाचा निर्णय घेणार हे स्पष्ट आहे.