22 फेब्रुवारी 2025
कोंबड्याविरोधात एका व्यक्तीने नोंदवली तक्रार, काय गुन्हा?
केरळच्या पथानमथिट्टा जिल्ह्यातील एका गावात एक बातमी चर्चेत आहेत. यात एका व्यक्तीने कोंबड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कोंबड्याचा गुन्हा असा आहे की, तो रोज सकाळी 3 वाजता उठून बांग देतो. त्यामुळे सदर व्यक्तीची झोप मोड होते.
राधाकृष्ण कुरुप नावाच्या व्यक्तीने या गोष्टीला कंटाळून महसूल विभागीय कार्यालयात तक्रार केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून सदर प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला गेला. कुरूपच्या शेजाऱ्यांने कोंबड्याला वरच्या मजल्यावर ठेवू नये.
इतकंच काय तर प्रशासनाने सदर कोंबड्याला 14 दिवसांच्या आत इतर ठिकाणी हलवण्याचा आदेश दिला असल्याचं वृत्त आहे.