कडीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. वजन कमी करण्यासाठीही त्याचा वापर उपयुक्त ठरतो.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कमी कॅलरी असलेला कडीपत्ता हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे.
कडीपत्त्याचे सेवन केल्याने तुमची वारंवार खाण्याची सवय कमी होऊ शकते.
कडीपत्ता हा ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो, ज्याचा वेट लॉसमध्येही परिणाम दिसून येतो.
कडीपत्ता खाल्ल्याने पचनशक्ती व मेटाबॉलिज्म सुधारते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
मात्र, वजन कमी करण्यासाठी केवळ कडीपत्ता उपयोगाचा नाही, त्यासाठी इतरही प्रयत्न करावे लागतात. पण कडीपत्त्याचे सेवनही फायदेशीर ठरते.
कडीपत्ता हा हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम असतो. त्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
तसेच आपले डोळे, त्वचा आणि केसांसाठीही कडीपत्ता फायदेशीर ठरतो.