दसरा

दसरा

हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला आणि सर्वात मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमी या तिथीला येतो.

दसरा

आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. 

दसरा

त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.

दसरा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही दसरा सणाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

दसरा

दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. 

दसरा

विजयादशमीच्या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. 

दसरा

याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला, त्यामुळेच देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. 

दसरा

प्रभू श्रीरामचंद्राने लंका नरेश रावणाचा पराभवही याच दिवशी केला. त्यामुळेच या दिवशी रावण दहनाची प्रथा सुरु झाली 

दसरा

असत्यावर सत्याचा विजय म्हणून या सणाला विजयादशमी असेही संबोधले जाते. 

दसरा

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. 

दसरा

अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी लढाईला जात असत, त्यालाच सीमोल्लंघन म्हणत. 

दसरा

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा आहे.

दसरा

"साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा !" या तुकोबांच्या अभंगातूनही दसऱ्याचा उल्लेख आढळतो.