‘हे’ पदार्थ एकत्र खाऊ नका

तूप आणि मध

तूप आणि मध कधीही एकत्र खाऊ नये. पाण्यात मध आणि तूप मिसळणे देखील हानिकारक असू शकते. तूप किंवा तेल किंवा बटरमध्ये मध मिसळला तर ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते. एक म्हणजे मध स्वतःच गरम पदार्थ आहे. तो आणखी कोणत्याही गरम गोष्टीसह खाऊ नये, अन्यथा आपल्याला पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

मांस-मासे आणि मध

मांस आणि माशांसह मध खाऊ नये. त्यांच्याबरोबर मध सेवन केल्यास आपल्या शरिरात टॉक्सिक घटक वाढतात. याचा परिणाम डोळ्यांवर आणि कानांवरही होऊ शकतो. यामुळे आपल्या दृष्टीदोष किंवा बहिरेपणा देखील येऊ शकतो. 

मध आणि मुळा

मुळा कधीही मधासोबत खाऊ नये. यामुळे आपल्या शरिरातील टॉक्सिन भरपूर प्रमाणात वाढतात. यामुळे आपल्या शरीराचे अवयव खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणून मुळ्याचे सेवन करताना कधीही मध खाऊ नये.

मध आणि दही

मध कधीही दह्यामध्ये मिसळून खाऊ नये. यामुळे गॅस, अॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या देखील उद्भवू शकतात. तसेच, साखरेसह कधीच मध खाऊ नये. साखरेसह मध खाणे म्हणजे एखादा विषारी घटक खाण्याप्रमाणे असेल.

हेही ध्यानात ठेवा...

पालक कधीच तिळ घालून खाऊ नये. असे केल्याने अतिसाराचा धोका वाढतो. तूप दहा दिवस कांस्य भांड्यात ठेवले असेल, तर ते तूप खाऊ नये. पिवळे मशरूम मोहरीच्या तेलात शिजवून खाऊ नये. तूप, तेल, खरबूज, पेरू, काकडी, बेरी आणि शेंगदाणे कधीही थंड पाण्यासोबत खाऊ नयेत.