हेअर कलरनंतर 'या' चुका टाळा

केसांना कलर केल्यानंतर विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. बर्‍याच वेळा काळजी घेतल्यानंतरही केसांचा रंग फिकट होतो. यामागे दोन कारणे असू शकतात. प्रथम म्हणजे कलर करणाऱ्याने चांगल्या दर्जाचे कलर वापरले नसतील. दुसरे म्हणजे आपल्या लहान चुकादेखील कलर फिकट करण्याची कारणं असू शकतात.

हेअर कलर केल्यानंतर आपल्या केसांचा रंग फिकट होणार नाही असा शॅम्पू वापरण्याचा सल्ला देतात. परंतु बर्‍याच वेळा आपण त्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपला नियमित शॅम्पू वापरण्यास सुरवात करतो. ज्यामुळे केसांचा रंग फिकट होऊ लागतो. कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू तुमच्या केसांचा कलर प्रोटेक्ट करण्याचे काम करतो.

चुकीचा शॅम्पू वापरणे

पूर्वी लोक केस स्ट्रेट करण्यासाठी आणि स्टायलिश करण्यासाठी पार्लरमध्ये जात असत. पण आता हळूहळू ट्रेंड बदलत आहे. लोक घरी स्टायलिंग टूल्सचा वापर करून केस स्ट्रेट करतात. जर आपण केसांना कलर केले असेल आणि हिट प्रोटेक्टर न वापरता जर टूल्सचा वापर करीत असाल तर केसांचा रंग लगेच फिकट होतो.

हिट प्रोटेक्टरचा वापर टाळा

काही लोकांना गरम पाण्याने आंघोळ करण्याची आणि केस धुण्याची सवय असते. गरम पाण्याने आंघोळ करणे आरामदायक असले तरी केसांच्या रंगासाठी हानिकारक आहे. गरम पाण्याने आंघोळ केल्याने केस कमकुवत होतात. तसेच केसांचा रंगही फिकट होतो. गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने केस धुवावेत.

गरम पाण्याने केस धुवू नका