राहु गोचरामुळे गुरु चांडाळ योग येणार संपुष्टात, या राशींचं होणार भलं
30 दिवसांनी राहु करणार गोचर, चांडाळ योग संपताच या राशींना मिळणार लाभ
30 ऑक्टोबरला राहु मेष राशीतून मीन राशीत गोचर करणार आहे. यामुळे गुरु चांडाळ योग संपुष्टात येणार आहे.
मेष राशीत राहु आणि गुरुची युती झाल्याने चांडाळ योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ज्योतिषशास्त्रात गुरु चांडाळ अत्यंत अशुभ योग मानला जातो. यामुळे प्रगतीत अनेक अडचणी येतात.
मेष : गुरु चांडाळ योग संपुष्टात येताच या राशीच्या जातकांना प्रगती दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील.
सिंह : या राशीच्या जातकांना नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येतील. पगार वाढ होण्याची शक्यता आहे.
तूळ: या राशीच्या जातकांना गेल्या काही दिवसात अडचणींचा सामना करावा लागला होता. आता कामं होताना दिसतील.
क्लिक
करा