पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी

30 November 2023

Created By: Chetan Patil

लोकसभा निवडणुकीआधी पाच राज्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत

या निवडणुकांना लोकसभेआधीची सेमीफायनल मानलं जात आहे

राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये नुकतंच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं

येत्या 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पण त्याआधी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे

या आकडेवारींनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्याची शक्यता आहे. तिथे भाजप सर्वाधिक जागांवर यश मिळवू शकतं

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या हातून सत्ता जावू शकते. तिथे काँग्रेसच्या हाती सत्ता येण्याची शक्यता आहे

छत्तीसगडमध्ये गड राखण्यात काँग्रेसला पुन्हा यश मिळू शकतं.

तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काँटे की टक्कर आहे. त्यामुळे एमआयएम पक्ष किंगमेकर ठरु शकतो.

मिझोराममध्ये ZPM पक्ष आणि MNS पक्ष यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे.